इंटरनेट वर तुमची माहिती कशी रोज चोरली जात आहे!

जर इंटरनेट चा विचार केला तर हा अधिकार खरंच तुमच्याकडे आहे का? तुमची प्रायव्हसी कितपत सुरक्षित आहे? जर तुम्हाला जर असं वाटतं असेल की तुम्ही इंटरनेट वर जे काही पहाता, वाचता, ते इंटरनेट हिस्ट्री डिलिट केली की कोणालाच कळणार नाही . पण ते तसे नाही, तुम्ही फार तर तुमच्या घरच्या लोकांपासुन तुमची नेट ऍक्टीव्हीटी लपवू शकाल.

तुमच्या मोबाइल वर गुगल मेल ऍप नक्कीच असेल, तुम्ही कुठेही गेलात तरीही गुगल मेल तुमचा डेटा गोळा करत असते. अगदी मिनिट टू मिनिट तुमच्या मुव्हमेंट्स गुगल ट्रॅक करतं. खरं वाटत नसेल तर इथे लिंक देतोय, तुमच्या गुगल अकाउंट ला लॉग इन करून ह्या लिंक वर क्लिक करा आणि स्वतःच बघा.

कुठलेही ब्राउझर वापरतांना काम सोपे होण्यासाठी आपण बरेच प्लग इन इन्स्टॉल करतो, ते ताबडतोब काढून टाका.

तुम्ही कुठल्या साईट्स ला भेट देता, काय वाचता, कुठले व्हिडीओ पहाता, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला माहिती असतात. तुमच्या सगळ्या नेट वरच्या ऍक्टीव्हीटीचे त्यांच्याकडे रेकॉर्ड, डेटा ऍनॅलिसीस त्यांच्याकडे असते. तुमच्या ऍक्टीव्हीटीज ऍनॅलाइझ करून तुम्हाला तुमच्या इंटरेस्टच्या जाहिराती पुश करत असते

आता एक साधे उदाहरण देतो, तुम्ही नेट वर कॅमेरा सर्च केला, की तुमच्या जी मेल अकाउंट मधे, फेसबुक पेज वर सगळ्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या आणि त्याला लागणाऱ्या ऍक्सेसरीजच्या जाहिराती दिसणे सुरु होते. स्वतः चेक करुन पहा. बरेचदा तुम्ही एखादं टॉरंट शोधत असता, आणि तुमचा आय एस पी प्रोव्हायडर चा मेसेज येतो की तुम्ही जे करताय ते कायद्याच्या विरुद्ध असल्याने तुम्हाला दाखवता येत नाही.

बहुतेक सगळ्यां आय एस पी चे सर्व्हर अमेरिकेत किंवा युरोप मधे आहेत. नुकताच अमेरिकेत एक नवीन नियम पास करण्यात आलेला आहे, त्या नियमान्वये तुमचा आय एस पी प्रोव्हायडर तुमचा सगळा डाटा कोणालाही विकु शकतात, त्या मधे तुमची ब्राउझिंग हिस्ट्री, डाउनलोड हिस्ट्री, तुमची मेडिकल इनफर्मेशन, तुमचे इ मेल चे कंटॆंट्स, तुमचे गुगल वर सेव्ह करुन ठेवलेले फोटोग्राफ्स, बॅंक आणि फायनान्स डिटेल्स वगैरे सगळं ! एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात फुकट काहीच मिळत नसते, मग ते साधे ऍप असले तरीही तुम्ही बरीच हिड्न किंमत मोजत असता त्या ऍप च्या वापरासाठी.

तुम्ही जेंव्हा एखादे ऍप मोबाइल वर इन्स्टॉल करता, तेंव्हा तुम्ही त्या ऍप “फुकट ” देणाऱ्या कंपनीला बऱ्याच परनवानग्या न वाचता देता.खरं तर तुम्हालाच तुमच्या प्रायव्हसी ची किंमत नाही, तर मग ती इतरांनी म्हणजे आय एस पी नी तरी का ठेवावी? कुठलेही ऍप डाउनलोड करतांना कुठल्या प्रकारची परवानगी आपण देतो आहोत हे नक्कीच चेक करा आणि योग्य वाटेल तो निर्णय घ्या.आंधळेपणाने सगळया टर्मस ऍंड कंडीशन्स मान्य करु नका.

आय पी ऍड्रेस म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरची इंटरनेट वरची खरी ओळख. तुम्ही जरी खोटा इ मेल आयडी बनवुन कोणाला मेल पाठवला तरीही त्या मेल सोबत तुमचा खरा आयपी ऍड्रेस जात असतो- तो कसा पहायचा हे आधीच्या एका पोस्ट मधे लिहिलेले आहे.त्या आय पी ऍड्रेस वरुन तुम्ही नेमकं कुठल्या कॉम्प्युटर वरुन लॉग इन केले ते सहज समजु शकते, आणि तुमची ओळख पण पटवली जाऊ शकते.

तरी पण या मधुन बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तुम्ही स्वतःचे व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क बनवुन इंटर्नेट ब्राउझ केल्यास आपल्या ऍक्टीव्हीटी लपवु शकता. या साठी तुम्हाला आपला स्वतःचा आयपी ऍड्रेस मास्क करावा लागेल.कसे?? अगदी दहा मिनिटात होणारे काम आहे हे.

ह्याकरिता गुगल वरती free vpn असे सर्च करा आणि तुम्हाला आवडेल ते vpn डाउनलोड करून त्याद्वारे आपले IP address बदला, त्यानंतर तुमची online activities ट्रेक करून विकता येणार नाही.