बिझनेस लोनबाबत तुम्ही करत असलेल्या चूका.

तुम्ही लघु उद्योजक असून तुम्हाला बिझनेस लोन हवे असेल तर त्यासाठी लागणारी मंजूरी मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही थोडी पूर्वतयारी केली तर अर्ज नामंजूर होण्याची शक्यता कमी होईल. कर्ज देणार्‍या कंपन्या अर्जाचे मूल्यांकन करतात आणि मग कर्ज मंजूर करायचे की नाही हे ठरवतात.

लोन अर्ज मंजूर व्हावा अशी इच्छा आहे? खालील चुका करू नका!

१. लोनसाठी अर्ज करायला शेवटच्या क्षणापर्यन्त थांबू नये

आर्थिक मदत घेतली नाही तर व्यवसाय बंद पडेल असे जेव्हा काही उद्योजकांना लक्षात येते तेव्हाच ते लोनसाठी अर्ज करतात, पण हे धोकादायक असते. लोन मिळवण्यासाठी कर्ज देणारी योग्य कंपनी शोधणे, कागदपत्रे तयार करणे, अर्ज करणे आणि शेवटी पैसे तुमच्या खात्यात जमा होणे या सगळ्या क्रियेसाठी किमान ३० दिवस आवश्यक असतात.

२. अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर तपासून न पाहणे

बिझनेस लोन मंजूर होण्यासाठी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर हा महत्त्वाचा घटक असतो. व्यवसाय आणि अर्जदार यांनी यापूर्वी घेतलेले कर्ज फेडले आहे की नाही हे तपासण्यासाठी कर्ज देणार्‍या कंपन्या अर्जदाराचा आणि व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर पाहतात. क्रेडिट स्कोअरमध्ये काही समस्या असल्यास लोन नामंजूर होऊ शकते. म्हणून लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी व्यवसाय मालकाकडे क्रेडिट स्कोअर तयार असायला पाहिजे.

३. एकाच वेळी अनेक लोनसाठी अर्ज करणे

अनेक उद्योजकांना असे वाटते की त्यांनी अनेक ठिकाणी लोनसाठी अर्ज केला तर एक तरी लोन मंजूर होण्याची शक्यता वाढते. पण यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर दुष्प्रभाव पडतो आणि लोन मिळण्याची शक्यता कमी होते.

४. आवश्यक कागदपत्रे तयार न ठेवणे

लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराला बिझनेस प्लॅनसह अनेक आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. लोन का हवे आहे, लोनची रक्कम कशासाठी वापरली जाईल, किती नफा अपेक्षित आहे इत्यादी माहिती बिझनेस प्लॅनमध्ये असायला हवी. सादर केलेल्या कागदपत्रांच्या निरीक्षणानंतर लोन मंजूर होईल किंवा नाही हे ठरवले जाते.